खेड

आळंदी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा : नागरीकांची मागणी

महाबुलेटिन नेटवर्क
आळंदी : आळंदी शहराला रोज पाणी कधी मिळणार यासाठी आळंदी शहरातील काही जागरुक युवकांनी आळंदी नगरपरिषदेला निवेदन देऊन आळंदी शहराला रोज पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे.
           पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या कडे देण्यात आले. यावेळी धनंजय घुंडरे, प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, लखन घुंडरे उपस्थित होते.
आळंदी नगरपरिषदेने १ जानेवारी २०२० पासून आळंदी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला उन्हाळ्यात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि कोरोणाचे संकट असल्याने आळंदी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य केले परंतु आता पावसाळा सुरू झाला तरी आळंदी शहरात पाणी पुरवठा सुरळीत का होऊ शकला नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे, आज गेली अनेक वर्षे आळंदी शहरातील बहुतेक सर्व जन पिण्याचे पाणी हे विकत घेत असतात, नगरपरिषदेचे पाणी हे फक्त कपडे आणि भांडी धुण्यासाठी वापरत असतात.
आळंदी शहरातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा हीच नवीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडून आळंदी शहरातील नागरिक अपेक्षा करत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

19 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

2 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

6 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.