महाबुलेटीन न्यूज
भोर : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्मार्ट ग्राम ( आर.आर. पाटील सुंदरगाव ) या पुरस्काराने भोर तालुक्यातील रायरी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी आजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील अल्पबचत भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच वर्षा किंद्रे, माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे, ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यामध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
भोर तालुक्यातील एकूण १५५ ग्रामपंचायती असून या सर्वांमधून २०१८/१९ या सालातील ‘सुंदर गाव पुरस्कार’ हा रायरी गावाला मिळालेला आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. यामध्ये स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन सरपंच सूर्यकांत किंद्रे, ग्रामसेवक पदमाकर डोंबाळे, उपसरपंच, ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव स्तरावर राबवलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, कचरा, सांडपाणी, आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सन २०१८-१९ सालचा ‘सुंदर गाव पुरस्कार’ रायरी गावाला मिळाला आहे.
या शिवाय भोर तालुक्यातील ससेवाडी ग्रामपंचायतीला सन २०१९/२० सालचा, तर बारे बुदुक गावाला सन २०२०/२१ सालचा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांचाही उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रायरी, ससेवाडी व बारेबु ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याबददल तालुकास्तरातुन अभिनंदन होत आहे.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.