विधायक

राष्ट्रीय संरक्षण दिवसा निमित्त एल.ई.डी. बल्ब, ट्यूब व एल.ई.डी. हॅलोजनचे वाटप करून खेड तालुक्यातील शाळा लख्ख प्रकाशल्या..

 

ग्रामीण भागातील शाळांमध्ये निर्माण करण्यात आला उजाळा….

महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : ऊर्जा संवर्धन आणि उर्जा कार्यक्षमतेचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी १४ डिसेंबर हा “राष्ट्रीय संरक्षण दिवस” म्हणून साजरा केला जातो. उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि भविष्यातील वापरासाठी उर्जा स्त्रोत वाचविण्यासाठी कमी उर्जा वापरण्याचा प्रयत्न म्हणजे ऊर्जा संवर्धन. ऊर्जा संवर्धन कार्यक्षमतेने किंवा वापरण्याचे प्रमाण कमी करुन ऊर्जा बचत घ्येय साध्य करण्याच्या हेतूने चाकण एमआयडीसीतील महिंद्रा हेवी इंजिन्स लि. आणि यश फौंडेशनने खेड तालुक्यातील शाळांना आवश्यकतेनुसार सूर्योदय प्रकल्पांर्गत एल.ई.डी. बल्ब आणि ट्यूब वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

एल.ई.डी. म्हणजे ‘लाईट एमिटिंग डायोड’ होय. आजवरच्या सर्वोत्तम शोध पैकी एक म्हणून याची गणना केली जाते. एल.ई.डी. बल्ब इतर कोणत्याही बल्ब पेक्षा जास्त ऊर्जा व प्रकाश देतात. शिवाय हे बल्ब व ट्यूब ह्या रिसायकल देखील करता येतात. जवळपास 95 टक्के बल्ब व ट्यूब रिसायकल होऊ शकतात.

राष्ट्रीय संरक्षण दिवसाचे औचित्य साधून विजेची बचत व्हावी, सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ व्हावा. या हेतूने महिंद्रा हेवी इंजिन्स लिमिटेड, चाकण व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यां मधील दहा शाळांमध्ये एल.ई.डी. बल्ब, ट्यूब एल.ई.डी हलोजनचे वाटप करण्यात आले आणि शाळेतील उपस्थित विध्यार्थ्यांना ऊर्जा बचतचे महत्व सांगण्यात आले. शाळांमध्ये हे सर्व बल व ट्यूब वाटप करण्यामागचा उद्देश हा होता की, लॉकडाऊन झाल्यानंतर बरेच महिने शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळेतील वर्गामध्ये लाईटची अवस्था अत्यंत खराब झाली होती. बऱ्याच शाळा या ग्रामीण भागात येत असल्यामुळे तेथे लाईटची सुविधा देखील नव्हती. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवत असताना अनेक अडचणी येत होत्या.

आणि त्याच अनुषंगाने महिंद्रा हेवी इंजिन्स लिमिटेड व यश फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून खेड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय खरपुडी, नूतन माध्यमिक विद्यालय रेटवडी, वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी, दुराफे विद्यालय आळंदी, भानोबा विद्यालय कोयाळी, सुभाषचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बहुळ, ज्ञानेश्वर गणपराव टाकळकर विद्यालय टाकळकरवाडी, श्री. महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव, हनुमान माध्यमिक विद्यालय चिंचोशी, भाऊराव मेनुजी पिंगळे पाटील विद्यालय गुळाणी या शाळांमध्ये एल.ई.डी. बल्ब व ट्यूब तसेच एल.ई.डी हलोजनचे वाटप करण्यात आले. सदर शाळांमध्ये शाळेच्या आवश्यतेनुसार १२९ एल.ई.डी. बल्ब, १५४ ट्यूब व १० एल.ई.डी हलोजन बल्बचे वाटप करण्यात आले.

शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत. तसेच त्यांचे जीवन या प्रकाशा सारखे तेजोमय व्हावे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास महिंद्रा हेवी इंजिन लिमिटेड कंपनीचे सागर खराटे , संतोष शिवेकर , संदीप धर्मा, घनश्याम लांडगे , श्रीमती. शुभा नायर, शिवाजी वाणी, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच सर्व विद्यालयाचे मुख्यध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
——

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.