महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा ( पुणे ) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कलाकार दत्तात्रय तिटकारे यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पन करुन हिंदीतील क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, तुझसे है राबता या मालिकेत काम करत ‘बाईकर्स अड्डा’ या मराठी चित्रपटामध्ये देखील अभिनयाचे काम केले. त्यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन काढलेल्या ‘रक्षित:’ या शॉर्ट फिल्मला प्रथम पोरितोषिक मिळाले.
त्यांनी आदिवासी तरुणांना सोबत घेऊन जबरदस्त अशी अमोल टोंगरे दिग्दर्शित ‘रक्षित:’ ही शाॅर्ट फिल्म बनविली. या फिल्ममध्ये आदिवासी समाजाच्या संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी आदिवासी समाजातील कथानक त्यात घेण्यात आले आहे.
रोशनी इंटर नॅशनल शाॅर्ट फिल्म आणि nawada international film festivel-2020 ( बिहार ) यामध्ये ही शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी देण्यात आली होती. यात रक्षित: या शॉर्ट फिल्मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
या शॉर्ट फिल्मसाठी अमोल टोंगरे दिग्दर्शित दत्ता तिटकारे, प्रॉडक्शन अॉफ वैनतेय भोसले, निकिता गुजर, विजया पिचड, श्रीकांत निचीत, दिपक जरड, रवी तेलधुने, भरत घावटे, विशाल पठारे या तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.