आरोग्य

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण…

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण…

महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर 
पुणे दि.28 : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य सेवा (उपसंचालक) डॉ. मिलींद मोरे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे (उपसंचालक) डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून ४४२ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. 

आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण…
टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
*****

 

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.