गुन्हेगारी

राजगुरुनगरला कोरोनाच्या भीतीने जेष्ठाची आत्महत्या

हाताची नस चाकूने कापून संपवली जीवनयात्रा
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर :
येथील बाजारपेठेतील एका ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाने कोरोनाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, त्यांची पत्नी व त्यांना २३ जुलै रोजी केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना संसर्ग झाल्यामुळे दोघांनीही पुण्यातील एका खासगी रुग्णालयात १५ दिवस उपचार घेतेले. उपचार घेतल्यानंतर चार ऑगस्टला ते घरी आले असता त्यांनी होम क्वारंटाईन करून घेतले. त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने त्यांनी आपल्या हाताची नस धारदार सुरीने कापून आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी ( दि. ७ ) रोजी त्यांचा पुन्हा स्वाब घेऊन त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांनी हे कृत्य केले. आज ( दि. ८ ) सकाळी त्यांचा मुलगा त्यांना झोपेतून उठवायला गेला असता ही घटना उघडकीस आली. राजगुरूनगर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.