महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : कृषि उत्पन्न बाजार समिती खेड मुख्य मार्केट यार्ड राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू सोयाबीन भुसार खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ आमदार श्री. दिलीपराव मोहीते. पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे) यांच्या शुभ हस्ते तसेच जेष्ठ संचालक माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांचे अध्यक्षतेखाली, सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारू कृष्णा गवारी, सर्व संचालक मंडळ, सचिव बाळासाहेब धंद्रे, सर्व शेतकरी बंधू, अडते, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. त्यास शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मार्केट यार्डात आज सोयाबीनची २६०० क्विंटल आवक होऊन ३४०० ते ३६६० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते की, आपण आपला सोयाबीन हा शेतीमाल जास्तीत जास्त बाजार समिती मध्ये विक्रीस घेऊन यावा. सोयाबीन शेतीमालाचे ओपन लिलावाने बाजारभाव ठरवले जातात. ताबडतोब व चोख वजन तसेच सर्वांना रोख पेमेंट दिले जाते. खेड मार्केट यार्डवर आठवड्यातून प्रत्येक मंगळवार व शुक्रवार या दिवशी सोयाबीन शेतीमाल लिलाव केले जातील.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.