महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : येथील न्यायालयापासून ४०० मीटर अंतरावर नवीन दुचाकीचा अचानक स्फोट झाल्याने वडील व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष प्रभाकर शेवाळे (वय ३२) व त्यांचा मुलगा यश प्रभाकर शेवाळे (वय १०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
संतोष प्रभाकर शेवाळे ( रा. तोरणा रेसिडेन्सी, अहिल्यादेवी चौक, राजगुरुनगर) हे त्यांचा मुलगा यश याला घेऊन पाणी आणण्यासाठी त्यांच्या हिरोहोंडा दुचाकीने (क्र. एमएच १४ जेएन ४३१७) जात होते. घरापासून १०० अंतरावर असताना त्यांच्या दुचाकीचा स्फोट झाला. यात संतोष शेवाळे यांचे दोन्ही पाय मांड्यांजवळ फाटले व रक्तबंबाळ झाले. तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाच्या आवाजाने अनेक जण स्फोट झालेल्या ठिकाणी गोळा झाले. अतुल ठाकूर, लाला सावंत, शंकर बोंबले यांनी जखमी संतोष व त्यांचा मुलगा यश यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले. दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गाडीच्या चिंधड्या उडाल्या.
संतोष शेवाळे यांनी तीन महिन्यांपूर्वी नवीन हिरोहोंडा गाडी घेतली होती. नवीन गाडी असतानाही तिचा स्फोट कसा झाला? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. हिरोहोंडा कंपीनीच्या नवीन गाडीचा स्फोट झाल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. नवीन गाडीचा स्फोट झाल्याने त्यास संबंधित कंपनी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून कंपनीने याबाबत तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.