महाबुलेटीन न्यूज : नाजीम इनामदार
राजगुरूनगर ( २८ जून ) : कोविड लस घेण्यासाठी राजगुरूनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्र येथे आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या गर्दीने सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडालेला यावेळी दिसून आले. येथील आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी केलेल्या एकच गोंधळामुळे लसीकरणला काही वेळ व्यत्यय आला.
राजगुरूनगर शहरात मुंबई माता बाल संगोपन केंद्रात १८ वर्षावरील लसीकरण सुरु झाले आहे. या दरम्यान तीनशे जणांना लसीकरण केले जाते. आरोग्य विभागाच्या वतीने १० वाजता लसीकरणाला सुरुवात होते. आज दि.२८ जून रोजी लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांसह १८ वर्षावरील नागरिकांनी सकाळ पासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती.
सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना गर्दी होऊ नये म्हणून १ ते ३०० पर्यंत टोकन दिले होते. मात्र तीनशे पेक्षा अधिक नागरिक आल्याने तेही टोकनसाठी आरोग्य विभागाशी वाद घालत होते. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी झालेली मोठी गर्दी व सोशल डिस्टन्सला दाखवलेली केराची टोपली यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.
आरोग्य विभागाने १ ते ३०० टोकन दिले, त्यानुसार लसीकरण सुरु करण्यात येणार होते. तोच पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी गर्दी टाळण्यासाठी रांगा लावण्याची तंबी दिली. सकाळपासून रांगेत उभे राहून नंतर टोकन घेऊन बाजूला उभे असणारे नागरिक मागे राहणार, म्हणून त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी अचानक येऊन केलेल्या गोंधळामुळे जेष्ठ नागरिकांसह युवकांनी नाराजी व्यक्त केली. शेवटी टोकन पद्धतीने लसीकरण झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी याठिकाणी येऊन गर्दी पांगवली. काही काळाच्या गोंधळानंतर लसीकरण सुरळीत झाले.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.