अध्यात्मिक

राजगुरुनगर येथे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

 

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर प्रतिनिधी (दि. २४) : राजगुरुनगर येथील भीमानदी तीरावर वसलेले श्री दत्त मंदीर हे प्राचीन मंदीर असून; श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी येथे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन सोमवार (दि. २८) ते बुधवार (दि. ३०) या तीन दिवसात करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष व राजगुरूनगर सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष प्रताप आहेर व रवींद्र जोशी यांनी दिली. 

सोमवार (दि.२८) रोजी सकाळी ८ वा. आभिषेक, महापूजा व प्रेमध्वज पूजन यजमान नथुराम तनपुरे यांचे हस्ते करुन उत्सवास प्रारंभ होणार आहे. नंतर गायत्री यज्ञ यजमान बापु शेट्ये यांचे हस्ते पार पडणार असून संयंकाळी प्रेमध्वज पूजन होऊन प्रेमध्वजाची मिरवणूक निघून मंदिरात ध्वजारोहण
करण्यात येईल. यावेळी प्रताप आहेर, अविनाश नाणेकर, राजेंद्र बरबटे, ऍड. गणेश होनराव, बाबा साळुंके, ऍड. अतुल घुमटकर, प्रभाकर जाधव व सर्व गुरुबंधू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मंगळवार (दि. २९) रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व “ओम नमः शिवाय” चा अखंड मंत्रजागर यजमान समीर आहेर यांच्या हस्ते होऊन; दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सायंकाळी दत्त जन्मावर ह.भ.प. विठ्ठल महाराज गुंडाळ यांचे प्रवचन होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तदनंतर आरती व भाविकांना सुंठवडा वाटप केले जाणार आहे. रात्रौ ८ वाजता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व मास्क परिधान केलेल्या गुरुबंधुच्या उपस्थितीत
ग्रामप्रदक्षिणा तसेच भजन पालखीसेवा होणार आहे.

बुधवार (दि. ३०) रोजी दुपारी ३ वा. श्री दत्त विश्वस्त मंडळाचे वतीने भजनसेवा व सामुदायिक मंत्रजप होवून श्रींची आरती आणि विशाल घुमटकर यांच्याहस्ते महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष प्रताप आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अविनाश नाणेकर, नथुराम तनपुरे, रविंद्र सांडभोर, माणिक तनपुरे, अजित डोळस, नारायण जाधव, समीर आहेर, बाबा साळुंके, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, जयश्री आंबडेकर, सुनंदा दहितुले, आदी गुरू बंधूं- भगिनी करणार असल्याची माहीती जगन कुंभार यांनी दिली.

यावेळी कोरोना महामारीचा संसर्ग लक्षात घेता मर्यादीत भाविकांमध्येच उत्सव साजरा करण्यात येणार असून भाविकांनी व सर्व गुरू बंधूंनी सोशल डिस्टन्सचे पालन तसेच मास्कचा वापर कटाक्षाने करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

9 minutes ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.