महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : एका गाडीत २२ म्हशींची पारडी दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी नेत असलेल्या तीन जणांवर राजगुरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गाडीसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून जुन्नर येथे कत्तलीसाठी चाललेली म्हशींची पारडी भरलेली गाडी राजगुरूनगर हद्दीतून जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना दिली. या माहितीच्या आधारे पोलीस शिपाई शिंगाडे व पोलीस शिपाई सुधीर बाळासाहेब शितोळे यांनी तत्काळ छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड समोर पोहचून तपकिरी रंगाचा टाटा कंपनीचा ११०९ हा टेम्पो ताब्यात घेतला. त्यात एकूण २२ पारडी दाटीवाटीने करकचून भरलेले कुठलीही चारापाण्याची व्यवस्था न करता चालविलेले दिसले. सदरचा टेम्पो क्रमांक ( एम.एच. ०६ ए. सी. ८९३९ ) जप्त केला असून त्यात १४ टोणगे व ८ पारडी जप्त करून पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण ३,५०,०००/- लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहम्मद चौधरी व अहमद चौधरी ( दोघेही रा. खलीलपुरा, जुन्नर, ता.जुन्नर, जि. पुणे ) तसेच वाहन चालक सलील कादर इनामदार ( वय ५३ वर्षे, रा. वाडा, ता. खेड, जि. पुणे ) यांचेवर प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१),(ड),(इ), महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ६,९,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कारभळ हे पुढील तपास करत आहेत.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.