निवड/नियुक्ती

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र वाळुंज बिनविरोध

 

महाबुलेटीन न्यूज
राजगुरुनगर, (प्रतिनिधी) : उत्तर पुणे जिल्याहातील अग्रगण्य बँक म्हणून नावलौकिक असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र वाळुंज यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.

बँकेच्या मावळत्या अध्यक्षा शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे यांनी नुकताच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक घेणे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगाने बँकेच्या राजगुरुनगर येथील मुख्यालयात संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी राजेंद्र वाळुंज यांचा एकमेव अर्ज आला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहनिबंधक श्रीकांत श्रीखंडे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

यावेळी विजयाताई शिंदे, उपाध्यक्ष अरुण थिगळे, ज्येष्ठ संचालक प्रतापराव आहेर, किरण आहेर, किरण मांजरे, सतीश नाईकरे पाटील, दिनेश ओसवाल, ऍड. मुकुंद आवटे, ऍड. डी. के. गोरे, सागर पाटोळे, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, धनंजय कहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे आदी सभागृहात उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्यावर राजेंद्र वाळुंज यांचे जेष्ठ संचालक प्रताप आहेर यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाचे उपस्थितीत स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मावळत्या अध्यक्ष विजयाताई शिंदे, किरण आहेर, किरण मांजरे, ऍड. मुकुंद आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. तर उद्योजक राजेंद्र वाळुंज यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.

“मंदीचे सावट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आर्थिक वर्षात कर्ज वाटप कमी झाले होते. तरी गुंतवणुकीतून सुमारे १३ कोटी रुपयांचा नफा बँकेने मिळवला. बँकेवर सभासद, खातेदार यांचा विश्वास असल्याने मंदीतही बँकेकडे १२०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. बँकेने वाहनकर्ज सर्वात कमी म्हणजे ८.२५ टक्के व्याज आकारणी सुरु केली असून बँकेचा एन. पी. ए. रेशो कमी करण्यासाठी संचालक मंडळाच्या सल्ल्याने पुढील काळात धोरणात्मक निर्णय घेऊ.”
– राजेंद्र वाळुंज, नूतन अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक

“मला मिळालेल्या कालावधीत ३० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या असून ५४ कोटींचे कर्जवाटप आणि २८ कोटी रुपयांची कर्ज वसुली यामुळे एन. पी. ए. रेशो कमी झाला असल्याने समाधान वाटते.”
– विजयाताई शिंदे, मावळत्या अध्यक्षा राजगुरुनगर सहकारी बँक.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

21 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.