महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरु जयंती दिनी २४ ऑगस्ट रोजी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव व हुतात्मा राजगुरू यांच्या ११४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शहीद राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, बाबू गेणू, विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
राजगुरूनगर जवळील चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता या हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहीद परिवार वारस यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड तालुका यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संपूर्ण लोकसहभागातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती सदस्य अॅड. निलेश आंधळे, मधुकर गिलबिले, अमर टाटीया, अॅड. मनीषा पवळे, बाळासाहेब सांडभोर, आनंदराव गावडे, किशोर कुमठेकर, पंकज नाईकरे, बाबाजी शिंदे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती, खेड तालुका हुतात्मा राजगुरू प्रेमी व सर्व सामाजिक संस्थांच्यावतीने या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000
– हनुमंत देवकर ( अध्यक्ष : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका )
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.