गुन्हेगारी

पुण्यातील नामवंत सराफ व्यावसायिकाची छातीत गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न…

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे (वय ६०) यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मराठे यांचे लक्ष्मी रोडवर ‘मराठे ज्वेलर्स’ हे दुकान असून तेथेच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रोडवरील दुकानात असताना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून अचानक आवाज आला.

तो आवाज ऐकून दुकानातील कर्मचारी तिकडे धावले. तेव्हा मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे त्यांनी पाहिले कर्मचार्‍यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे़.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़. मराठे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

1 hour ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

6 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.