प्रशासकीय

पुण्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, लग्न समारंभ, राजकीय व खासगी कार्यक्रमांवर हे आहेत निर्बंध…

 

● आज पासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी…
● लग्न तसेच खासगी, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध. २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी
● पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
● पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेता येणार नाहीत

महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : पुणे जिल्ह्यात कोविडचा वाढता संसर्ग पाहता पुणे मनपा शहर आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक संपन्न झाली या वेळी पशुसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून,जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) यांची प्रभावीपणे अंमलबजावणी, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर ब ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण करणे, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक केले आहे. संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

दरम्यान पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ‘हॉटस्पॉट’ प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत केल्या.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर भेटी देऊन सुपर स्प्रेडर, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची स्वाब तपासणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी बैठकीमध्ये केले.

दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांगितले की, सध्या एनआयव्हीमध्ये चाचण्या बंद आहेत. जीनोम सिक्वेन्सींग सुरू असल्याने चाचण्या बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागांत कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. लग्न तसेच खासगी, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध. २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल.

ससुन रुग्णालयामध्ये कोरोना चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. उद्या हॉटेल असोसिएशनबरोबर बैठक होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेता येणार नाहीत. लग्नासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. पोलिसांना २ तासांत परवानगी द्यावी लागणार आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये वावर मर्यादित करण्यासाठी पत्रे लावले जातील. तसेच संचारबंदी लागू न करता नियंत्रित संचारावर भर दिला जाईल. या नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.