कोरोना

मोठी बातमी ! पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर; PMC ने लष्कराकडे मागितली मदत…

मोठी बातमी! पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर; PMC ने लष्कराकडे मागितली मदत…

Corona Cases in Pune : पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता (lack of bed and Ventilator) जाणवत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे. 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, 9 एप्रिल : देशात कोरोना विषाणूची (Corona virus in India) स्थिती भयावह बनत चालली आहे. देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona Cases) वाढ होतं आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात नोंदले जात आहेत. यातही मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणंही कठिण बनत चाललं आहे. पुण्यात आयसीयू आणि व्हेटिलेटर बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेनं मदतीसाठी लष्कराला साकडं घातलं आहे. 

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात 489 बेडला व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरानंतर काही बेड उपलब्ध झाले. पण पुण्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे.

पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता (lack of bed and Ventilator) जाणवत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे. पुण्यात भारतीय लष्कराचं एक मोठं रुग्णालय आहे. या लष्करी रुग्णालयात 335 बेड आणि 15 व्हेंटीलेटरची अद्ययावत सुविधा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं लष्कराकडे मदत मागितली आहे. 

लष्करी रुग्णालयाकडून मदत मिळण्याची आशा पुणे महानगरपालिकेनं व्यक्त केली आहे. परंतु या मागणीबाबत अद्याप लष्करी रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.