पुणे जिल्हा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी 50 टक्के अनुदान : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
पुणे, दि. 28 सप्टेंबर : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत 2020-21 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी 50 टक्के अनुदान रक्कम रूपये 2 लाख 30 हजार प्रति रोपवाटिका राबविण्यासाठी कृषि व पदुम विभागाने मान्यता दिली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.

3.25 मीटर उंचीचे शेडनेट गृह (सांगाडा उभारणी ) :- 1 हजार चौ.मी. 380 प्रति चौ. मी. प्रकल्पासाठी 3 लाख 80 हजार खर्च तर 1 लाख 90 हजार रूपयांचे अनुदान असणार आहे.

प्लॉस्टिक टनेल :- एक हजार चौ.मी.क्षेत्रासाठी 60 प्रति चौ. मी. असा मापदंड तर 60 हजार रूपये प्रकल्पाचा खर्च व 30 हजार अनुदान असणार आहे.

पॉवर नॅपसॅक स्प्रेअर :- 1 क्षेत्रासाठी 7 हजार 600 मापदंड व 7 हजार 600 खर्च तर 3 हजार 800 रुपये अनुदान असणार आहे.

प्लास्टिक क्रेटस :- 62, 200 मापदंड तर 12 हजार 400 खर्च तसेच 6 हजार 200 रुपये अनुदान असणार आहे. एकूण 4 लाख 60 हजार रुपये प्रकल्पाचा खर्च तर व 2 लाख 30 हजार रूपये अनुदान असणार आहे.

रोपवाटिका प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने उपरोक्त चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहणार आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची,कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवा‍टिका उभारणी करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत: च्या मालकीची 0.40 हेक्टर जमीन व रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. तसेच महिला कृषि पदवीधाराकांना प्रथम प्राधान्य, महिला बचत गट, महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल.

● सदर योजने अंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.