महाबुलेटिन नेटवर्क | प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एकाच दिवसात ५७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव राखण्यासाठी खेड तालुका येत्या २८ जुलै पर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खेड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध निर्बंध घालून संबंधित भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. ज्या गावात ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, अशा २१ गावांचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून २४ जुलै पर्यंत घोषित करण्यात आलेले आहे. परंतु तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने संबंधित गावांमध्ये १३ जुलै च्या अटी व शर्ती कायम ठेवून दि. २८ जुलै पर्यंत पुन्हा लॉक डाऊन वाढविण्यात आला असल्याची माहिती डेप्युटी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली आहे.
ही गावे आहेत कंटेंनमेंट झोन
राजगुरूनगर, चाकण, आळंदी, कडूस, पाईट, येलवाडी, निघोजे, दावडी, सोळू, मरकळ, काळूस, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, सातकरस्थळ, पिंपरी बुद्रुक, वाकी खुर्द, शेलपिंपळगाव, चिंबळी, मोई.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : राजगुरूनगर – ११, चाकण – ४, आळंदी – १३,
# ग्रामीण : सांडभोरवाडी – १, सातकरस्थळ – ४, राक्षेवाडी – १, होलेवाडी – १, शेलपिंपळगाव – २, काळुस – १, बहुळ – १, कुरुळी – १, खालुंब्रे – २, कान्हेवाडी – ३, मेदनकरवाडी – १, नाणेकरवाडी – ३, येलवाडी – १, गुळाणी – १, दावडी – १, सायगाव – १, रौंधळवाडी – १, वाडा – ३
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५७
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ८७८ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १६
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३९१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४७१
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.