ग्रंथालय

पुणे विभागीय व पुणे जिल्हा ग्रंथालय अधिवेशन ५ मार्चला सासवडला होणार

महाबुलेटीन न्यूज

पुणे : पुणे विभागीय व पुणे जिल्हा ग्रंथालय अधिवेशन ५ मार्च रोजी सासवड येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते व प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी दिली.

संत सोपानकाका व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या भूमीत हे अधिवेशन संपन्न होणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांना उदघाटन समारंभासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. तर खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार उल्हासदादा पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.

या अधिवेशनात ग्रंथालय चळवळ वाढीसाठी ग्रंथदिंडी, साहित्यिकांचा मेळावा, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रंथालय चळवळ राबविताना येणाऱ्या अडचणी शासनाकडे मांडण्यात येणार आहेत. यावेळी ग्रंथालयाच्या विशेष अधिवेशन स्मरणिकेचे प्रकाशन करून आदर्श कार्यकर्ता, आदर्श ग्रंथालय, आदर्श ग्रंथपाल आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय कोलते, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्याध्यक्ष चंद्रशेखर कपोते, उपाध्यक्ष मार्केंडेय मिठापल्ली, राजू घाटोळे, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले, विलास चोंधे, कोषाध्यक्ष संतोष गोफणे, संचालक अरुण दांगट, रमेश सुतार, विठ्ठल शिंदे, हनुमंत देवकर, विजय कचरे, हमीद तांबोळी, खेड तालुकाध्यक्ष बाबासाहेब ठाकूर, पुरंदर तालुकाध्यक्ष नामदेव झुरंगे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आदी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले व जिल्हा निरीक्षक श्रीकांत संगेपांग यांची भेट घेऊन ग्रंथालय वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा केली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.

MahaBulletin

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.