खेड

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार

महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी : पुणे विभागिय आयुक्त पदी पुण्याचे माजी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाल्या बद्दल आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषद आरोग्य समितीचे सभापती नगरसेवक सागर भोसले, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आळंदी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरीत विकास कामे, आळंदी भैरवनाथ चौक ते पद्मावती रस्त्याचे विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली. याशिवाय येथील एमआयटी महाविद्यालयात सुरु होत असलेल्या आळंदी कोविड केअर सेंटरला आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, आरोग्य सेवक आदी गरजेचा स्टाफ उपलब्द्ध करून देण्याची मागणी केली. यामुळे येथील कोविड रुग्णांची स्थानिक ठिकाणी सोय होईल असे सांगत संवाद साधला. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आळंदीतील प्रलंबित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी मागणी प्रमाणे स्वतंत्र बैठक लावण्याची ग्वाही देत आळंदीकरांचे वतीने करण्यात आलेला सत्कार स्वीकारला.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

17 minutes ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

18 minutes ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.