महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ६९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात १० रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात ४७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील दोन पुरुष व शेलपिंपळगाव येथील एका पुरुषाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १६०७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड विभागातील ( खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर ) आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २२ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – १०, आळंदी – ७,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४७ ) : चऱ्होली ७, शेलपिंपळगांव ५, सोळू ३, वडगाव घेनंद ३, महाळुंगे ३, काळुस २, राक्षेवाडी २, रानमळा २, नाणेकरवाडी २, तर रेटवडी, खरपुडी, पूर, कोयाळी, भोसे, शिरोली, वाकी बुद्रुक, सातकरस्थळ, वडगाव पाटोळे, देवोशी, आसखेड, कोये, वहागाव, शेलू, निघोजे, मेदनकरवाडी, खराबवाडी, वासुली या १८ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ६९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १६०८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ३७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ११३६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १०
# मयत झालेल्या व्यक्ती : ०३ ( राजगुरूनगर : १ पुरुष : वय ७३, श्वास हॉस्पिटल, १ पुरुष : वय ७४, जहांगीर हॉस्पिटल, शेलपिंपळगाव : १ पुरुष : वय ५७, बढे हॉस्पिटल )
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.