निवडणूक

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी आंबेगाव तालुक्यात ८ मतदान केंद्र

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी होणार असून आंबेगाव तालुक्यात मतदानासाठी ८ मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या १९०२ व शिक्षक मतदारांची संख्या ७४५ आहे. केंद्रनिहाय ४ पदवीधर व ४ शिक्षक निवडणूक मतदान केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.

१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंभे खुर्द – पदवीधर मतदारसंख्या १४९, १) शिक्षक मतदारसंख्या ८८,
२) जनता विद्या मंदिर घोडेगाव – पदवीधर मतदार संख्या ४१८, २) शिक्षक मतदार संख्या- २२३.
३) महात्मा गांधी विद्यालय मंचर – पदवीधर मतदार संख्या ८५१. ३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर – शिक्षक मतदार संख्या -३०४.
४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक – पदवीधर मतदारसंख्या ४८४, ४) शिक्षक मतदार संख्या १३० आहे.

मंगळवार दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर २०२० रोजी बालेवाडी क्रिडा संकुल म्हाळुंगे पुणे होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातमतदार जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याद्वारे आंबेगाव तालुक्यात तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवून नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन मतदार जनजागृती पथक सदस्य सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, विजय घिसे, राहुल रहाटाडे, मंगेश जावळे, अशोक लोखंडे,संदीप बोंबले यांच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती मतदार जनजागृती पथक प्रमुख सुनील भेके यांनी दिली.

मत कसे नोंदवावे……
१) केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे इतर कोणताही पेन-पेन्सिल बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.
२) तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील “पसंतीक्रम नोंदवावा” या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे.
३) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.
४) आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2,3,4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकता.
५) एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.
६) पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्ये नोंदवण्यात यावेत हे एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.
७) पसंतीक्रम नोंदवतांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवावे.
८) मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये.
९) मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क√ किंवा क्रॉस मार्क × अशी खूण करु नये अशी मतपत्रिका अवैध ठरेल.
१०) आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
सबब पदवीधर व शिक्षक निवडणूक सन 2020 मधील मतदार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

आंबेगाव स्वीप पथकाच्यावतीने भीमाशंकर विद्यालय शिनोली, ता. आंबेगाव येथे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत मतदान कसे करावे याबाबतचे महितीपत्रक वाटप करत असताना.
MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

3 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

3 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

4 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

5 months ago

This website uses cookies.