पुणे जिल्ह्यातील ‘या’ पोलीस ठाण्यामधील सहा जणांना कोरोनाची लागण

महाबुलेटीन नेटवर्क / श्रीकांत बोरावके
आळंदी : आळंदी शहर व परिसरातील दहा जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉजिटीव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली आहे. यात आळंदी पोलीस स्टेशन मधील सहा जणांना कोरोनाची लागण झाली असून आता पर्यंत पोलीस स्टेशनमधील एकूण सात जण बाधित झाले आहेत.
यामध्ये चार अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देहू फाटा परिसरातील चार जणांचे देखील कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले असून शहरात कोरोना बधितांचा आकडा आता दहावर पोहचला आहे.
आळंदी पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सतरा जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते, त्यापैकी सहा जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले असून इतर अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. लॉक डाऊन मध्ये खऱ्या अर्थाने जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देऊन कोरोना योद्धा म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या पोलिसांनाच कोरोना लागण झाल्याने सर्वांची चिंता वाढत आहे. आळंदी शहरात कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला असून एकाच दिवसात दहा जण कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याचे आवाहन नगरपरिषद व प्रशासनाने केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

8 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

2 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

3 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

4 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

6 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.