महाबुलेटीन न्यूज
पुणे, दि.११ : शेतीच्या कामांसाठी पतपुरवठा वेळेत होणे गरजेचे असते. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसा कर्जपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
सन २०२१-२२ हंगामासाठी पीककर्ज दर ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची (डीएलटीसी) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये सन २०२१-२२ हंगामाकरिता पुणे जिल्ह्यासाठी पिक कर्ज दर निश्चित करण्यात आले. तसेच दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालनासाठी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता दर निश्चित करण्यात आले. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा विकास प्रबंधक (नाबार्ड) नितीन शेळके, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले, जिल्हा अग्रणी बँकेचे सरव्यवस्थापक किरण अहिरराव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह समिती सदस्य व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी समिती सदस्य व शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतीपिके, पतपुरवठा आदी विषयी संवाद साधला. हंगामातील प्रमुख पिके, ऊस लागवड नवीन पद्धती, ठिबक सिंचन द्वारे पाणी पुरवठा, डाळिंब पिकासाठी लागवड, बाजारपेठ नियोजन तसेच पिक कर्ज दराबाबत डॉ. देशमुख यांनी चर्चा केली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.