कोरोना

पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
विभागात कोरोना बाधित 1 लाख 35 हजार 433 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव
महाबुलेटीन न्यूज : विशेष प्रतिनिधी
पुणे : विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 41 हजार 86 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 67.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
—————–
पुणे जिल्हयातील 1 लाख 5 हजार 523 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 76 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 683 आहे.  कोरोनाबाधित एकूण 2 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  72.43 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
——————–
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 5 हजार 378 रुग्ण असून 2 हजार 493 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
————————
सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 250 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 486 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 218 आहे. कोरोना बाधित एकूण 546 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
———————
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 293 रुग्ण असून 1 हजार 313 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 853 आहे. कोरोना बाधित एकूण 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
————————
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 989 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 618 आहे. कोरोना बाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
—————————————————————–
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 139 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 639, सातारा जिल्ह्यात 199, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 208 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1009 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
————————————
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 90 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 35 हजार 433 नमून्यांचा अहवाल सकारात्मक ( पॉझिटिव्ह ) आहे.
————————
( टिप :- दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.