कोरोना

पुणे जिल्हा कोरोना अपडेट : जिल्ह्यात 50 हजार 573 रुग्ण बरे होऊन गेले घरी

जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 98 हजार 657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 885 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 982 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 79 हजार 99 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 50 हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 656 आहे.                                                                                                                                                                              यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 420, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 227, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 98, पुणे कॅन्टोंन्मेंट 148, खडकी विभागातील 22, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 741 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 290, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 331, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 39, ग्रामीण क्षेत्रातील 123 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

14 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.