महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्रामस्थरीय कोरोना दक्षता समिती स्थापना केली आहे. या समिती मध्ये पोलीस पाटील सदस्य/सचिव म्हणून काम करतात. पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून अहो रात्र काम करतात. राज्यातील सर्व पोलीस पाटलांना ५० लाखाचे विमा संरक्षण कवच देण्याची मागणी पोलीस पाटलांनी केली आहे.
पोलीस पाटील गावाची सुव्यवस्था, शांतता, राखण्याचे व त्याच बरोबर कोरोना बाबतची जनजागृती करून गावाची सेवा करत असताना आतापर्यंत राज्यात १३ पोलीस पाटलांचा मृत्यू झाला आहे. पोलीस पाटलांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी करून पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. पोलीस पाटील हा गावाचा कणा आहे. पोलीस पाटलांना विमा कवच देण्याचा विचार करावा, यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील तहसिल, प्रांत कार्यालय, तालुका प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले आहे. जर शासनाने मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंब व त्यांच्या परिवाराचा विचार केला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालाय समोर उपोषणला बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटननेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिला आहे.
खेड तालुक्यातील प्रांत कार्यालय, तहसील, तालुका प्रतिनिधी यांना खेड तालुका पोलीस पाटील संघटनने च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनचे कार्यकारी अध्यक्ष साहेबराव राळे, तालुका अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे, कार्यकारी अध्यक्ष निलेश दौंडकर, पप्पूकाका राक्षे, दादाभाऊ निकाळजे, संदीप भागडे, सुषमा आरुडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रतील सर्व पोलीस पाटील यांना शासनाने पन्नास लाखाचे विमा कवच द्यावे, जर शासनाने या मागणीचा विचार केला नाही तर उपोषणाला बसणार.
– बाळासाहेब शिंदे पाटील
अध्यक्ष, महाराष्ट्रराज्य पोलीस पाटिल संघटना
खेड तालुक्यातील प्रत्येक पोलीस पाटलांना शासनाकडून मास्क, पी पी ई किट उपलब्ध करून द्यावा.
– आत्माराम डुंबरे पाटील
उपाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना खेड तालुका.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.