पुणे जिल्हा

पीएमआरडीएकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विकासकामांसाठी ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर ● खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश ● शिरूर, खेड, हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळणार गती

पीएमआरडीएकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विकासकामांसाठी ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
● खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश
● शिरूर, खेड, हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळणार गती

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ३१ जुलै : शिरुर लोकसभा मतदारसंघातील खेड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या रु.८१७.५ लक्ष रकमेच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली आहे.

कोविड १९ चे जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने सन २०२०-२१ व २०२१-२२ असा दोन वर्षांचा रु.१० कोटींचा खासदार निधी अन्य कामांसाठी वळविला असला तरी अन्य योजनांतून भरघोस निधी आणण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले असून मतदारसंघातील विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे.                                                 

‘पीएमआरडीए’च्या सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी (इजिमा १४६) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १०१.०० लक्ष), मौजे गणेगाव येथील वरुडे, चिंचोशी, कान्हुरमेसाई (इजिमा १४२) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १३५.०० लक्ष), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे (रु.२८१.५० लक्ष), खेड तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रजिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (रु.७५.०० लक्ष), वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१) रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष), मौजे आखरवाडी अंतर्गत गावठाण ते ढमढेरे वस्ती रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष) आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (रु.७५.०० लक्ष) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

तसेच यापूर्वी कोरेगाव भीमा ते वढू बु. प्रजिमा १९ या ३.२५० कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी कि. मी.००/०० ते कि. मी. ९५०/०० लांबीचे १० मीटर रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून आतापर्यंत साडेचौदा कोटींची विकासकामे मंजूर करुन आपल्या कामांचा धडाका कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, “खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७-८ महिन्यांत कोविडचे संकट आले. केंद्र सरकारने २ वर्षांचा खासदार निधी रद्द केला. अशा परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी लोकांच्या अपेक्षांचे खूप मोठे ओझे शिरावर होते. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढून विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला. याखेरीज आमदार अॅड. अशोक बापू पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे करण्यात आम्हाला यश येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येत आहे हीच समाधानाची बाब आहे”, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.