महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : पी के टेक्निकल कॅम्पसच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतर्फे महाविद्यालयीन व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईल फोटोग्राफी’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पी के फाउंडेशनच्या संस्था प्रतिनिधी कु. निकिताताई खांडेभराड यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी संस्थेद्वारे विविध रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र इत्यादी बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला संस्थेद्वारे प्रमाणपत्र देणार देण्यात येणार आहे. स्पर्धा ही पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाणार असून https://forms.gle/qGrJkgaHDnKjtF1b9 या लिंक वर विद्यार्थ्यांना आपला प्रवेश नोंदविता येईल. तसेच आपण काढलेला फोटो अपलोड करता येईल. मोबाईल फोटोग्राफ पाठवण्याची अंतिम तारीख 25.10.2021 असेल.
सदर फोटोग्राफी स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला व नाविन्यतेला चालना देणारी असून सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मा. प्रतापराव खांडेभराड यांनी केले आहे.
००००
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.