महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड, दि. 9 : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत आचारसंहिता राहणार आहे. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. आचारसंहिता सुरु झाल्यापासून मतमोजणी पुर्ण होईपर्यंत विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार निवडणुक होणाऱ्या 5 डिसेंबर 2020 चे 12 वाजेपर्यंत आदेश लागू राहणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.
विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोटनिवडणूक 2020 ची संपुर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावारणात पार पाडणाच्या दृष्टीकोनातून शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय आधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये, व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे, मोर्चा काढणे, सभा घेणे उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
निवडणूक कालावधीत प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये 5 पेक्षा जास्त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. (सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेवून जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशात अधिन राहून अंमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
निवडणूक कालावधीत कोणतीही व्यक्ती संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाउड स्पीकरचा ) वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. तसेच फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये. ध्वनीक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे सकाळी 6 वाजण्यापुर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणीच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे आदेश : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत आचारसंहिता अस्तित्वात राहील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोटनिपवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यकता आहे.
पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे मिळालेल्या अधिकारानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांना खालील केले प्रमाणे अगर तोंडी आदेश अधिकार प्रदान करीत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणूकीचे व्यक्तीचे वागणे अगर कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे, मिरवणूकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाणी दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे.
हा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात 5 डिसेंबर 2020 चे रात्री 12 वाजेपर्यत लागू राहील. सदर आदेशाचे भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेशात म्हटले आहे.
000
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.