महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
अलिबाग : पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांशी उद्धटपणे वागणारया एका पोलीस निरिक्षकावर कालच निलंबनाची कारवाई झालेली असताना आज रायगडमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. माथेरानच्या पत्रकारास शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारया एका पोलीस कर्मचारयास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबचा आणि पत्रकारांच्या एकजुटीचा आणखी एकदा विजय झाला आहे.
माथेरान मधील पत्रकार दिनेश सुतार तसेच व्यापारी बिलाल महबळै यांना दारू पिऊन मारहाण करणारे माथेरान पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक शाम जाधव यांच्यावर रायगङ पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी पुढील आदेश मिळे पर्यन्त निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांना आठवड्यातून दोन वेळा अलिबाग येथे हजेरी लावण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होइपर्यंत निलंबन कायम राहणार असून पोलीस कर्मचारी जाधव यांच्यावर कारवाई होइपर्यंत पत्रकारांचे आंदोलन सुरू राहणार आहे. परंतु पत्रकारांचा आवाज लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.