निधन वार्ता

खेड तालुक्याच्या पत्रकारितेतील एक तारा निखळला

 

जेष्ठ पत्रकार, पोलीस पाटील व प्रसिद्द रंगकर्मी सुनील ओव्हाळ यांचे कोरोना संसर्गाने निधन,
पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच संरक्षण द्या : एस. एम. देशमुख विश्वस्त मराठी पत्रकार परिषद

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण (ता.खेड) : भोसे येथील पोलीस पाटील, खेड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व प्रसिद्ध रंगकर्मी श्री सुनील मल्हारी ओव्हाळ पाटील ( वय वर्ष ६० ) यांचे आज मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांना मधुमेहाचाही आजार होता. मागील दोन आठवड्यापासून त्यांच्यावर औंध रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसांपासून त्यांना जास्त त्रास होत होता, तसे त्यांनी परवा पत्रकार हरिदास कड यांच्याशी संवाद साधून सांगितले होते, मात्र उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सुनीत, मुलगी, दोन भाऊ, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गावातील प्रत्येक सामाजिक कामात ते हिरीरीने सहभागी होत होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरीब गरजू लोकांना खूप मदत केली. सर्वांना किराणा पोहचेल, कुणीही गरीब उपाशी राहू नये, म्हणून तळागाळातील वंचित घटकांपर्यंत जाऊन काम केले.

त्यांच्या अकाली जाण्याने भोसे गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दै.प्रभात व सामना सारख्या दैनिकाचे शेलपिंपळगाव प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयांना हात घालून न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. सुरुवातीच्या काळात ‘ठोका पाचर’ नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी तालुक्यात खळबळ उडवून दिली होती.

अभिनय, पटकथा व दिग्दर्शनाची आवड असल्यामुळे त्यांनी आझाद नाट्य कला मंचच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या नाटकांत अभिनयासह महत्वाची भूमिका पार पाडली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘बिजली कडाडली’ यासारख्या नाटकांत त्यांनी भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली.

सदा हसत मुख आणि मनाने तरुण असणाऱ्या सुनील ओव्हाळ पाटील यांचा सामाजिक कार्यातील सहभाग व उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. त्यांच्या जाण्यामुळे खेड तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना काळात राज्यातील अनेक पत्रकारांनी जोखीम पत्करून वार्तांकन केले असुन कोरोना योद्ध्यांचा भूमिका बजावून तळागाळातील वंचितांसाठी मदतकार्य केले आहे. आतापर्यंत राज्यातील १४ पत्रकारांचे कोरोनामुळे निधन झाले असून पत्रकारांना शासनाने त्वरित ५० लाखाचे विमा कवच संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.

 

भोसे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच शितल चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब कुटे, सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मुचकुंद जाधव, उद्योजक नितीन लोणारी, उद्योजक योगेश पठारे, रोटरी एअरपोर्टचे चे सचिव इक्बाल शेख, सोसायटीचे सर्व संचालक, स्वामी विवेकानंद ग्रंथालय, प्राथमिक व हायस्कुल शाळा, गावातील सर्व संस्थांच्या वतीने ओव्हाळ पाटील यांना श्रद्धांजली वाहिली असून गावातील एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.