महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमादरम्यान मोठी घटना घडली. हेलियमचे फुगे फुटल्यामुळे भाजपाचे ३० पेक्षा अधिक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूनतील चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान हेलियमच्या फुग्यांच्या स्फोट होऊन ३० कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली नाही. अंबात्तूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात हेलियम गॅसचे दोन हजार फुगे आकाशात सोडण्यात येणार होते.
१७ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त जनतेकडून तसेच राजकीय क्षेत्रातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.