धार्मिक

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे.

Mahabulletin News : Kedarnath Dham Yatra 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत झुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून सकाळी सात वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. बाबा भोलेनाथांच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली आहे.

उत्तराखंडमधील केदारधामचे दरवाजे आज (२ मे) सकाळी उघडण्यात आले. केदारनाथमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. मंदिर व आसपास बर्फ साठलेला असतो. त्यामुळे हिवाळ्याचे काही महिने ही यात्रा बंद असते. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. दरम्यान, आज अक्षय्य तृतीयेनंतर दोन दिवसांनी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. आता नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असेल.

* कडेकोट सुरक्षेत मंदिर भाविकांसाठी खुलं
अनेक भाविक उत्तराखंडमधील छोटी चारधाम यात्रा करत असतात. भाविक केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री व यमुनोत्री अशी छोटी चारधाम यात्रा केली जाते. केदारनाथमधील बाबा भोलेनाथांच्या दर्शनापासून ही यात्रा सुरू होते. दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक या चारधाम यात्रेसाठी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

* गुरुवारी पालखी सोहळा संपन्न
बाबा भोलेनाथांची पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी गुरुवारी दुपारी केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात केदारधाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं.

* सुरक्षेसाठी प्रशासनाकडून भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना
दरम्यान, केंदारनाथ यात्रेकरूंसाठी पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंदिराच्या ३० मीटर परिघात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात रील शूट करताना, फोटो काढताना कोणी आढळल्यास मोबाइल जप्त केले जातील, तसेच ५,००० रुपयांचा दड वसूल केला जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.