महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल ३५ वर पोहोचली असताना अचानक सिरीयस झालेल्या कोरोना बाधित रुग्णाला तातडीने पुण्याला हलविण्याचा निर्णय झाला.
तीन तास पुणे व पिंपरी चिंचवड येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी वणवण फिरून देखील कुठेही बेड शिल्लक नसल्यामुळे अखेर या रूग्णाला पुन्हा पुण्याहून नारायणगावला नव्याने सुरू करण्यात आलेल्या एका खाजगी कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे पंधरा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर हा रुग्ण चक्क स्वतःच्या पायावर चालत घरी आला ही घटना घडली आहे नुकतीच नारायणगाव येथे.
या आनंददायी घटने मुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी या रुग्णांचे फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांची उधळण व औक्षण करत जंगी स्वागत केले.
नारायणगावातील बाळासाहेब दळवी या ४६ वर्षीय युवकाच्या बाबतीत हा प्रसंग ओढवला. येथील मॅक्स केअर या रुग्णालयांमध्ये डॉ प्रतीक पाटील, डॉ धनंजय कोऱ्हाळे व त्यांच्या टीमने या रुग्णांवर यशस्वी उपचार केले. हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, श्रीमंत लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसाबे, सतीश दळवी, ग्रामपंचायत सदस्य अनिल दिवटे, पिंटू दिवटे, संजय कसाबे, तुषार दिवटे, सोमनाथ दळवी निलेश गोरडे आदींनी रुग्ण बाळासाहेब दळवी यांचे उत्साहात स्वागत केले.
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
This website uses cookies.