गुन्हेगारी

केवळ खून नाहीच…बलात्कारही! संतप्त नातेवाईकांचा आरोप

श्वान पथकाकडून तपास,काही संशयित ताब्यात
महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळला आणि पुन्हा निर्भया प्रकरणाची आठवण झाली. खेड तालुक्यात आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत सतरा वर्षीय मुलीचा खून करून, तिला विवस्त्र करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिचा मृतदेह झुडपात टाकून देण्यात आला होता.  हे प्रकरण काल दुपारनंतर उघडकीस आले होते. हे वृत्त सर्वप्रथम महाबुलेटिनने प्रसारित केले आणि वार्ता सर्वदूर पोहचल्याने एकच खळबळ उडाली.
     दरम्यान या खून प्रकरणानंतर मयत मुलीचे नातेवाईक आक्रमक झाले. पोलीस ठाणे, चाकण ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांनी गर्दी केली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. शवविच्छेदन चाकण ला न करता वायसीएम किंवा ससूनला करण्याची मागणी केली. या प्रकरणाने खेड तालुका हादरला असून हा केवळ खून नसून बलात्कारही आहे, तशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तत्पर अटक करा, अशी आक्रमक मागणी व आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केली.
पार्श्वभूमी…..
मयत मुलीची छेडछाड होत होती
या वादातून पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली.
या वादातून काही जणांनी मिळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून
ही घटना शुक्रवारी (दि. 24) खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत कॅनॉलजवळ घडली
पोलिसांनी दिलेली माहिती…
आरोपींनी फिर्यादी यांच्या मयत भाचीची छेड काढली होती. त्या कारणारून त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाची तक्रार मयत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात केली होती. या रागातून आरोपींनी  शुक्रवारी  फिर्यादी यांच्या मयत भाचीला आसखेड खुर्द गावच्या हद्दीत कॅनॉलच्या दरडीजवळ नेऊन डोक्यावर कठीण वस्तूने आघात केले. गंभीर जखमी झालेल्या त्या मुलीचा या जबर आघाताने मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत मुलीचा मृतदेह  झुडुपात टाकून दिला.
       आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 नुसार खून आणि खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
“हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी होण्यासाठी व  मयत मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मदत घेऊ . आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू”..
—– उमाताई खापरे – अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा भाजपा

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.