कोरोना

निमगाव केतकी येथील कोविड सेंटर उपचारासाठी सज्ज

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेले कोविड सेंटर उपचारासाठी सज्ज झाले आहे.
या संदर्भात माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद आरकिले यांनी सांगितले की, इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामीण रुग्णालयात वीस बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. ऑक्सिजनची कमतरता ही कोरोना रुग्णांला भेडसावणारी मुख्य समस्या आहे. त्यामुळे येथील प्रत्येक बेडला रुग्णास ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा जोडण्यात आली आहे. ऑक्सिजनची सुविधा नजीकच्या काळात सुरु होईल. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सेवा देण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. तशी सोय शासनस्तरावरुन करण्यात येणार आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी निमगाव केतकी, वरकुटे खुर्द, गोतोंडी व परिसरातील खाजगी डॉक्टर तैनात करण्यात येणार आहेत. उपलब्ध डॉक्टरांच्या संख्येनुसार त्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

15 hours ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 days ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

5 days ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

7 days ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 week ago

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

1 week ago

This website uses cookies.