इंदापूर

‘अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त, मटकेवाला मस्त’

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
निमगाव केतकीमध्ये अवैध धंदे जोरात
महाबुलेटिन नेटवर्क
इंदापूर : विड्याच्या पानासाठी प्रसिध्द असणा-या निमगाव केतकी गावात अवैध धंद्यांनी चांगलेच हात पाय पसरले आहेत. गावाच्या मध्यवर्ती भागात चालणा-या या व्यवसायावर, मध्यवर्ती ठिकाणी असणा-या पोलीस चौकीकडून कसलीही कारवाई होत नाही.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान असणा-या प्रमुख गावांमध्ये निमगाव केतकी गावाचा समावेश आहे. या गावाने तालुक्यास अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती दिले आहेत. येथील विड्याची पाने महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. येथे कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्तीचे मैदान प्रसिध्द आहे. तालुक्यातील तरकारी पट्टा म्हणून निमगाव परिसर नावाजला जातो.
तथापि, येथे चालत असलेल्या अवैध धंद्यामुळे गावाची बदनामी होत आहे. गावाच्या मध्यवस्तीत उघडपणे हातभट्टी दारुचा व्यवसाय चालतो आहे. तीन चार वर्षांपासून मटक्याचा धंदा ही फोफावला आहे. दहा ते पंधरा एजंट, दररोजची किमान दोन लाख रुपयांची उलाढाल असल्यामुळे ‘अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त, मटकेवाला मस्त’ असे सध्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या काळात निमगाव केतकीच्या मध्यवस्तीत पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी आहेत. मात्र अद्यापपर्यंत अवैध व्यवसायावर कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. हा मटक्याचा व्यवसाय म. फुले यांच्या नावाची संस्था चालवणारा शंकर भोंग नावाचा इसम चालवतो. त्याची दहशत असल्याने त्याच्याविरुध्द कोणी तक्रार करत नाही, असे निमगाव केतकीमधील लोक बोलतात.
admin

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.