निघोजे गावात मुलाच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी आई व कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले ४७ झाडांचे वृक्षारोपण,
महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिलाताई सोपान शिंदे यांचे चिरंजीव व खेड तालुक्यातील निघोजे गावच्या माजी सरपंच कांचनताई शिंदे यांचे पती, चाकण उद्योग नगरीचे युवा उद्योजक आणि भैरवनाथ लॉजिस्टिक उद्योग समूहाचे संचालक, कामगार नेते कै. संतोषभाऊ सोपान शिंदे ( वय ४७ वर्षे ) यांचे बुधवार ( दि. १६ नोव्हेंबर २०२२ ) रोजी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संकल्पनेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता त्यांच्या वयाइतकी ४७ झाडे लावून त्यांच्या स्मृतींचे जतन केले. गावातील व्यक्तीच्या निधनानंतर ‘स्मृती वृक्ष’ लावण्याचा स्तुत्य निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
यावेळी त्यांच्या आई माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे, पत्नी माजी सरपंच कांचनताई शिंदे, मुलगा कु. ओम, मुलगी, भाऊ, हिरामण शिंदे, निवृत्ती शिंदे, गणपतराव शिंदे, धनंजय मोरे, नामदेव शिंदे, कैलास येळवंडे आबू येळवंडे, बाळू शिंदे, किरण पानसरे, संतोष येळवंडे, सागर येळवंडे, रमेश खाडेभराड, विजय येळवंडे, प्रमोद कोळेकर, तानाजी शिंदे, सुदाम आरूडे, विग्नेश्वर येळवंडे, अशोक येळवंडे, भोर मामा, संभाजी शिदे, जालिंदर नाणेकर, ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी उपस्थित होते.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.