मुलाच्या निधनाच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू
महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेतील निवृत्त आदर्श क्रीडा शिक्षक, जुन्या काळातील राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते रामदास गणपत उनधरे सर ( वय ६५ वर्षे ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी संस्थेत ३० ते ३२ वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून सेवा केली. त्यांनी एनसीसी, स्काऊट गाईडच्या माध्यमातून प्रशालेला वैशिष्ट्यपूर्ण उंचीवर नेऊन ठेवले. तसेच पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी शाळेला पंतप्रधान ढाल मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. सामाजिक कार्यात ते हिरीरीने भाग घेत असत. चाकण शाळेला स्थानिक दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते एक उत्कृष्ट छायाचित्रकारही होते. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलगी ज्योती पासलकर ह्या चाकण प्रशालेत शिक्षिका असून मुलगा दीपक हे डीआरडीओच्या संशोधन केंद्रात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तसेच बंधू शिवाजी उनधरे हे श्री शिवाजी प्रशालेत प्राध्यापक आहेत.
————
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.