गुन्हेगारी

मतिमंद तरुणीवर बलात्कार…?

तरुणी सहा महिन्याची गर्भवती, मुलीच्या आईकडून पोलिसात फिर्याद
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर :
कनेरसर ( ता. खेड ) येथील एका शेतकरी कुटुंबातील मतिमंद मुलीवर गावातील एकाने बलात्कार केला असून संबंधीत मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांच्या माहीतीप्रमाणे, घरी कोणी नाही याचा गैरफायदा या प्रकरणातील संशयित महेश दौंडकर याने घेतला. मतिमंद मुलीवर बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनी मुलगी आजारी पडली. तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. याबाबत गावातीलच आणि मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित महेश पोपट दौंडकर यांच्या विरोधात मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलिस हवालदार सुरेखा भोर हे पुढील तपास करीत आहेत..

दरम्यान, मुलीच्या आई वडिलांनी मुलीला चैतन्य महिला सस्था येथे दाखल केले होते. या घटनेबाबत चैतन्य महिला सस्थेने खेड पोलिसांना माहिती दिली. खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुरेखा भोर यांनी पीडित मुलीचे समुपदेशन करून विचारले असता तिने घराशेजारील महेश दौंडकर उर्फ पिंट्या याने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला तसेच याबद्दल कोणास काही सांगितले तर तुला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.