महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील निवृत्त मंडल निरीक्षक तसेच वारकरी सांप्रदायाचे जेष्ठ कै. गुरुवर्य ह.भ.प. रामदास ( बापुजी ) वामन जवळेकर यांचे आज वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुणे येथे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
गेली काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. पुणे येथील पुणे हॉस्पिटल येथे त्यांचेवर उपचार सुरु होते. आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली. सामाजिक व आध्यत्मिक क्षेञात त्यांचे योगदान मोठे होते. तिन्हेवाडी रोड वरील विठ्ठल-रुख्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक व राजगुरुनगर येथील खंडोबा माळावरील खंडोबा देवस्थानचे चंपाषष्ठी कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हणून त्यांची विशेष ओळख होती. लोकांच्या पत्रिका बघणे, लग्नकार्य जुळवणे, पत्रिकेत दोष असेल तर त्यावर उपाय सांगणे असा उपक्रम त्यांनी निस्वार्थपणे विनामोबदला आयुष्यभर राबवला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व असंख्य पारमार्थिक शिष्यगण असा परिवार आहे.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.