निवड/नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते व पक्षप्रतोद पदी नगरसेवक फिरोज पठाण यांची नियुक्ती

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
जुन्नर : येथील नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व पक्षप्रतोद यापदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या पदावर फिरोज पठाण यांची गटनेता व पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ही निवड करण्यात आलेली आहे. पठाण हे 2006 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2009 मध्ये उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली होती. 2011 ते 2016 या कालावधीत स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षाने संधी दिली. 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर ते जनतेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. माजी आमदार वल्लभ बेनके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

7 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.