महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : नवरात्रोत्सवासाठी पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. यामध्ये विशेषतः घटस्थापनेच्या साहित्याचा समावेश असून, खाण्याच्या विड्याची पाने, खजूर, फळे, फुले, नाडापुडी, नारळ, पत्रावळी, मातीचे घट (कुंभ), नऊ प्रकारची मिक्स केलेली धान्य, आदी साहित्यासह काळी मातीही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. राजगुरूनगर शहरातील कुंभारगल्ली, बाजारपेठ, मारुती मंदिर, जुना मोटर स्टँड, वाडा रोड याठिकाणी घटस्थापनेचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला आहे.
शारदीय नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना करून आपापल्या कुलदेवतेची आराधना केली जाते. नऊ दिवस उपवास केले जातात. यासाठी घरोघरी जय्यत तयारी आरंभली जाते. घराची स्वच्छता करून देवघराची विशेषतः स्वच्छता केली जाते.
देवघरात घटस्थापना केली जाते. यासाठी लागणाऱ्या साहित्यांची बाजारात वर्णी लागली आहे. राजगुरूनगरमध्ये पानमळा, भांबुरवाडी, रेटवडी आदी भागातून विड्याच्या पानांची मोठी आवक होते. याशिवाय नारळ, नाडापुडी, कापूर, अगरबत्ती, तेल, पत्रावळी, मातीचा घट, नऊ प्रकारची मिक्स केलेली धान्य, काळी माती आदी वस्तू बाजारात दाखल झाल्या असून बाजारपेठ, मारुती मंदिर, जुना मोटार स्टॅन्ड, वाडा रोड आदी ठिकाणासह स्थानिक बाजारात सर्वत्र या वस्तु विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या फुलांच्या माळांसाठी झेंडूच्या तसेच तिळाच्या फुलांचे ढीगही जागोजागी दिसत आहेत.
दसऱ्यापर्यंत रोज याठिकाणी फुलांची विक्री होत असून मारुती मंदीर वाडा रोड येथे फुलांची सर्वात जास्त विक्री होते.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस व्रतस्थ राह्ण्याची प्रथा आहे. त्या काळात देवाला नैवेद्य आणि उपवासाचा पदार्थ म्हणून खजुराचा व राजगिरा, वरई, साबुदाणा आदी उपवासाच्या पीठांचा तसेच फळांचा वापर केला जातो. उपवासाचा पदार्थ म्हणून खजुराचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. यात काळा खजूर, जायदी, कलामी असे विविध प्रकार उपलब्ध असून सध्या हे सर्व प्रकारचे खजूर व विविध प्रकारची फळे बाजारात दाखल झाली आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.