महाबुलेटीन न्यूज
नाशिक : नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अन्न व सुरक्षा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगाणे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून जे या घटनेसाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या रुग्णालयात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णांना टँकरमधून एका पाइपद्वारे एकाचवेळी ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मात्र टँकरमध्ये गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम झाला. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे ऑक्सिजन अभावी गुदमरून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. काही रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले. ज्यांनी ऑक्सिजन प्लांट बसवला त्यांच्या तंत्रज्ञांपैकी एकही व्यक्ती घटनास्थळी नव्हती, असे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
● निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.