पुणे जिल्हा

नारायणगावात बेकायदा गॅस पाईपलाईन खोदकाम प्रकरणी महेश गॅस एजन्सी वर गुन्हा दाखल गॅस कंपनीला दोन कोटी १५ लाख रुपये भरपाई द्यावी लागणार

 

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव ( किरण वाजगे) : नारायणगाव शहरामध्ये बेकायदा व विनापरवाना रस्त्याचे खोदकाम केल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील खराडी, येथील महेश गॅस एजन्सी या कंपनीवर नारायणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती जुन्नर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंदाजपत्रकानुसार या कंपनीला २ कोटी १५ लाख ६१ हजार ५६२ रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. 

दरम्यान गॅस पाईपलाईनचे काम चालू असताना काही जागरूक नागरिकांनी हे काम अयोग्य असल्याचे सांगितले होते. मात्र स्थानिक सरपंच व त्यांच्या पाठिराख्यांनी हे काम योग्य व कायदेशीर पद्धतीने चालू असल्याचे सांगितले होते. परंतु महेश गॅस कंपनी वर गुन्हा दाखल झाल्याने एक प्रकारे विद्यमान सरपंचांना चपराक बसल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात बेकायदा गॅस पाईपलाईन खोदकाम प्रकरणी फिर्याद दिली असून माहिती अधिकार सेवा संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे माहिती अधिकारात गॅस प्रकल्पाबाबत माहिती मागवली होती.

त्या माहिती अधिकारा मधून मिळालेल्या माहितीनुसार, महेश गॅस एजन्सीचे पाईपलाईनचे काम बेकायदेशीर पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून चालू होते हे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तानाजी तांबे व मकरंद पाटे यांनी दिली आहे.

नारायणगाव पोलिसांनी महेश गॅस एजन्सी, खराडी पुणे यांच्यावर शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव येथील सार्वजनीक बांधकाम, जिल्हा परिषदेच्या हद्दीतील शासकीय मालकीच्या जागेतून शासकीय विभागांची कोणतीही परवानगी न घेता गॅस एजन्सीने घरगुती गॅस लाईन टाकण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पुणे नाशिक महामार्ग लगत पूनम हॉटेल ते कोल्हे मळा, हनुमान चौक, वाजगे आळी, मावळे आळी, जुन्नर रस्ता, खैरे आळी, नारायणवाडी ते खोडद रस्ता येथे बेकायदेशीर रित्या रस्त्यांचे खोदकाम केले. तसेच १४ व्या वित्त आयोगातुन चालु असलेल्या गटारलाईनच्या कामात नारायणगाव येथे साकार नागरी ते हनुमान चौक मार्गे नेवकरपुल दरम्यान गॅसचे फायबर्सचे पाईप टाकले. त्यामुळे महेश गॅस एजन्सीने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी शासनाची फसवणूक केली. 

यामध्ये नागरिकांना या सुरु असलेल्या कामांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मकरंद पाटे यांनी गॅस एजन्सीकडे रीतसर कामासंदर्भात शासकीय परवानगी आहे का अशी विचाराना केली होती. पण गॅस कंपनीने माहिती देण्यास टाळाटाळ करून काम चालूच ठेवले होते. अखेर पाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे तक्रार करून जुन्नर न्यायालयात १५६ (३) नुसार याचिका दाखल केली होती.

जुन्नर न्यायालयाने नारायणगाव पोलिसांना तक्रारीची दखल घेऊन तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने नारायणगाव पोलिसांनी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच माहिती अधिकार सेवा समितीचे तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी ही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी पुणे व प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रार केली होती. यापुढील तपास नारायणगाव पोलीस हे करीत आहेत.

माहिती अधिकार सेवा समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी तांबे आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी महेश गॅस एजन्सीच्या विरुद्ध केलेल्या तक्रारी नुसार जुन्नर पंचायत समितीने नारायणगाव शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३१ लाख ५४ हजार २६० रुपये, सार्वजनिक बांधकाम जुन्नर यांच्या अंतर्गत असलेल्या कामासाठी १६ लाख ८४ हजार ३७५ व ४५ लाख २६ हजार ५६२ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग क्र . ४ पुणे यांनी त्यांच्या हद्दीतील कामा पोटी ३ लाख १० हजार ५०० रुपये तेसच जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्याच्या कामापोटी जिल्हा परिषद उपविभाग यांनी १८ लाख ८६ हजार ८० रुपये असे अंदाजपत्रक करून भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मकरंद पाटे व तानाजी तांबे यांनी दिली आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.