कोरोना

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे कोरोना बाधीत

 

जुन्नर तालुक्यात आजपर्यंत ११५८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६८० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी
जुन्नर तालुक्यात आज एकूण ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
वडज येथे आज ११ पॉझिटिव्ह रुग्ण

महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : येथील सरपंच योगेश पाटे हे आज कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्नर तालुक्यात आज ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण ११५८ रुग्णांपैकी ६८० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

वडज येथे ११ तर नारायणगाव येथे आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ओतूर येथे तीन, शिरोली बुद्रुक, येणेरे, निमगाव सावा व जुन्नर शहर येथे प्रत्येकी दोन, तसेच रोहोकडी, हिवरे तर्फे नारायणगाव, भोरवाडी, उंब्रज नंबर १, अमरापूर, निमगाव तर्फे महाळुंगे येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आज कोरोनामुळे शिरोली बुद्रुक येथील एक ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात सुमारे २३५ पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत ११५८ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर ४३२ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ४६ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

41 minutes ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.