गुन्हेगारी

नारायणगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा ए टी एम फोडण्याचा प्रयत्न फसला, दोन चोरट्यांना रंगेहात पकडले

 

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे) : बुधवार दि ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नारायणगाव बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.   

नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे – नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीनची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.

सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये, यावर नजर ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि. ३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पोलीस उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पो. नाईक शेख, होमगार्ड ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम. चेक करत होते. यावेळी होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय. ए.टी.एम. मध्ये दोन इसम एटीएम मशीनचे शटर अर्धे लावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्याच्या जवळील लोखडी टॉमीने होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना माहिती देऊन लागलीच पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना. काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे, लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर, होमगार्ड ढवळे, खंडे, पोलिसमित्र भरत मुठे, ईश्वर पाटे, ऋषिकेश कुंभार व इतर २० ते ३० असे त्या ठिकाणी जमा झाले.

या घटनेतील आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पो.ना. लोंढे, पो. ना. साबळे, पो.कॉ. वाघमारे, कोबल यांनी शटर वर करून सदर आरोपींना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले.

त्यातील आरोपी १) राहूल वसंत सुपेकर मुळ रा. निघोज पठारवाडी, ता. पारनेर, जि नगर सध्या रा. रांजणगाव एम.आय.डी.सी. २) बाजीराव बाळासाहेब नागरगोजे मुळ रा. चिंचपुर, ता. पाथर्डी, जि. नगर, सध्या रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ३८०, ४२७, ५११, ३४ वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो. उपनिरीक्षक हिंगे हे करत आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक पाटील, उपविभागीय पो. अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना. काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर, होमगार्ड ढवळे, खंडे यांनी केली आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.