सण-उत्सव

नारायणगाव ग्रामपंचायत येथे कोरोना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहन

 

सरपंच योगेश पाटे यांच्याकडुन रुग्णवाहिका चालक विनायक जाधव, ओंकार जंगम, संजय भोर यांना ध्वजारोहणाची संधी

महाबुलेटीन न्यूज / किरण वाजगे
नारायणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहन कार्यक्रम नारायणगावातील कोरोना योद्ध्यांच्या हस्ते करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

नारायणगाव व परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम यांनी कोरोना काळात कोरोना संशयीत व्यक्तींचे पीपीई किट घालून आपल्या जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले, आजारी पेशंट कोणतीही पर्वा न करता दवाखान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य देखील केले. तसेच आशावर्कर, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे कामही उल्लेखनीय आहे.


या कार्याचे कौतुक करत लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने कोरोना योद्धा रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम, व ग्रामपंचायत कर्मचारी माऊली माने यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन करण्यात आले. यानिमित्त गावात शासकीय कार्यालयांना विद्युत रोषणाई, मेन बाजारपेठेत तिरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती.

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे, मंडलाधिकारी डी. बी. काळे, तलाठी नामदेव सोनवणे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, राजेश बाप्ते, ज्योती दिवटे, रुपाली जाधव, भागेश्वर डेरे, योगेश गांंधी, नंदू अडसरे, ईश्वर पाटे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.