महाबुलेटीन न्यूज । आनंद कांबळे
जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाट (ता. जुन्नर) जवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ४) घडली आहे. या सर्व परिसरात पर्यटनाला बंदी असूनही अतिउत्साही पर्यटक पोलीस यंत्रणेला झुगारून किंवा दंड भरून येथे येत आहेत.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जीवधन गडावरून उतरताना निसरड्या झालेल्या पायरीवरून ही तरुणी शेजारील दरीत पडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीस सहकाऱ्यांनी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले. या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ (वय ३० वर्षे, रा. दिल्ली) असल्याची माहिती जुन्नर पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
सदर तरुणी दिल्लीहून ठाणे येथे आली होती. मुंबईहुन इतर तिघांसह ही तरुणी मोटारसायकलने नाणेघाट येथे मुक्कामास आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हे चौघे जीवधन किल्ल्यावर गेले होते. मागील आठवड्यात याच परिसरात पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.
—-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.